राष्ट्रीय
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, शिक्षणमंत्र्यांची घोषणा
मुंबई, 28 मे: शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत घेऊन दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. जून अखेरीस 10 वीचा निकाल लागणार असल्याची घोषणा वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तसंच कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रावर मोठं संकट आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत शिक्षणमंत्र्यांनी दहावी मूल्यमापन प्रक्रिया आणि अकरावी प्रवेशाबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मूल्यमापन होईल. राज्य मंडळातर्फे आयोजित इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यानुसार राज्य सरकारनं शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये दहावी परीक्षेसाठी प्रविष्ठ असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्याबाबत परवानगी दिली आहे.
बारावी परिक्षेबाबत सुद्धा आमची चर्चा सुरू आहे. लवकरच याबाबत निर्णय घेणार आहोत. सीबीएसई सोबत आमचं बोलणं सुरू असून विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि त्यांचे हित आमच्यासाठी महत्त्वाचे असल्याचं त्या म्हणाल्यात.
सर्व घटकांशी सखोल चर्चा करुन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणदान करण्याबाबतचे धोरण निश्चित केले आहे. या मूल्यमापन धोरणानुसार विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मूल्यमापन करण्यात येणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
नववी आणि दहावीसाठी सुधारित मूल्यमापन योजना सरकार निर्णयानुसार मूल्यमापन योजना निश्चित करण्यात आली आल्याचं त्यांनी सांगितलं. ज्या विद्यार्थ्यांना तयार केलेला निकाल समाधानकारक वाटत नसल्यास त्यांना कोविड-19 ची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेअंतर्गत दोन परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध असेल.
दरम्यान शाळास्तरावर गैरप्रकार अथवा अभिलेख यामध्ये फेरफार झाल्यास शिस्तभंग आणि दंडात्मक कारवाई याची तरतूद करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
शिक्षणमंत्र्यांच्या पत्रकार परिषदतले महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे
शिक्षण क्षेत्रात अनेक आवाहन आपल्याला आली. ऑनलाइन ऑफलाइन अनेक उपक्रम आपण केली- वर्षा गायकवाड
राज्य मंडळ दहावी रद्द करण्याचा निर्णय आपण आधीच घेतला आहे- शिक्षणमंत्री
अंतर्गत मूल्यमापन द्वारे आपण विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतला होता.
9 वी, 10वीसाठी सुधारित नियमावली
विविध घटकांशी आम्ही चर्चा केली. विद्यार्थ्यांचे 100 गुणांचे मूल्यपामन होईल.
विद्यार्थ्यांचे लेखी मूल्यमापनाला 30 गुण. प्रात्यक्षिक तोंडी 20 गुण (गृहपाठ आणि तोंडी परीक्षेला 20 गुण)
विषयनिहय 50 गुण नववीच्या आधारे.
नववीच्या निकालावर आधारित 50 गुण. प्रत्येक विषयांचं 100 गुणांचं मूल्यमापन
नववीचा 50 टक्के आणि दहावी 50 टक्के विषय निहायसाठी
समाधानकारक निकाल वाटत नसेल तर विद्यार्थ्यांना दोन परीक्षा कोविडनंतर देता येईल.
निकाल समिती मध्ये मुख्यध्यापकच्या खाली 7 सदस्य असतील.
10 वीचा निकाल जून अखेरीस जाहीर होणार.
11 वीसाठी प्रवेश परीक्षा घेणार. त्यासाठी सीईटी घेणार.
अकरावी प्रवेशासाठी आम्ही 11 वी साठी वैकल्पिक सीईटी परीक्षा घेणार.
10 वीच्या अभ्यासक्रमावर ही प्रवेश परीक्षा असेल.
ही परीक्षा 2 तासांची असणार
सीईटी परीक्षा मिळालेल्या मार्कनुसार प्राधान्यने प्रवेश दिले जातील आणि नंतर रिक्त असलेल्या जागांवर 10 वी मध्ये अंतर्गत मूल्यमापन गुणांद्वारे प्रवेश.
जूनपर्यंत दहावीचा निकाल लावण्याचा प्रयत्न करतोय. त्या दरम्यान आम्ही सीईटी चा विचार करतोय.
सर्वांना प्रवेश मिळेल यासाठी आमचे प्रयत्न आहे. अकरावीच्या अनेक जागा रिक्त राहतेय.